मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला. २ जागांसाठी शिवसेनेने २०१४ ला युती तोडली असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. मुंबईत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात सगळं काही सहन करा परंतु धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. धोका देणारा कधीच मजबूत होत नाही. मी कधीच शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता. असेही त्यांनी म्हणल.
हे पण वाचा :
केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती
अरे बापरे.. फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीने पत्नीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो-व्हिडीओ फेसबुकवर टाकले
सोन्या-चांदीच्या भावाने पकडला पुन्हा वेग, पहा आज किती रुपयाने महागले?
युवक रेल्वे ट्रॅकजवळ बनवत होता ‘इंस्टाग्राम रील’, तेवढ्यात मागून आली ट्रेन अन्.. पहा हा थरार Video
भाजपने कधीच छोटा भाऊ मोठा भाऊ केलं नाही पण शिवसेनेने मात्र फक्त २ जागांसाठी युती तोडली असं अमित शाह म्हणाले. मुंबईच्या राजकारणात फक्त भाजपचे वर्चस्व हवं, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं आवाहन अमित शहांनी नेत्यांना केलं. अमित शाह यांच्या आक्रमक भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शहा यांच्या टिकवर शिवसेनेचे नेते कस प्रत्युत्तर देतात हे आता पाहायला हवं