जळगाव,(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावाच्या जवळच असलेल्या विहिरीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळललेली महिला गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होती दरम्यान तिचा शोध सुरू असताना आज थेट तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.
गेल्या दोन – तीन दिवसापासून होती बेपत्ता….
धरणगाव शहरापासून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या जवळील शेतातील विहिरीत आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेहआढळून आला. त्यानंतर जी महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत महिला आणि तिचा पती पिंप्री येथे वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही लोकांना महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी झाली होती.पुढील तपास पोलीस करीत आहेत.