नाशिक,(प्रतिनिधी)- दारू पिऊन एका महिलेने बस मध्ये चांगलाच गोंधळ घातल्याने प्रवाशांसह एसटी चालक व वाहकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते बऱ्याचदा समजावून सुद्धा सदर महिला शांतता ठेवण्यासाठी तयार नव्हती… सदर महिला गोंधळ घालतचं राहिल्याने अखेर वाहकाने बस थेट पोलीस स्टेशन मध्ये नेली, पुढे काय झालं सविस्तर वाचा…
नाशिक घोटी मार्गावर काल सायंकाळी धावणाऱ्या बसेसमध्ये एका महिलेने दारू पिऊन चांगलाच गोंधळ घातला. अचानक या महिलेने गोंधळ घातल्याने प्रवाशांसह एसटी चालक व वाहकांमध्ये मोठा गोंधळ उडाला.अनेक प्रवाशांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र महिलेने कोणाचीही एक ऐकले नाही आणि गोंधळ घालनं सुरूच ठेवला. ह्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने एसटी वाहकाने बस पोलिस ठाण्यात नेत महिलेविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसात गुन्हा दाखल…
बस पोलीस ठाण्यात पोहचवल्यावर देखील सदर दारू पिलेली महिला पोहोचत या महिलेने पोलिस स्टेशनमध्ये देखील गोंधळ घातला. अखेर सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. दारू पिलेल्या सदर महिलेने पोलिस कर्मचाऱ्यांना देखील अरेरावी केल्याचेही समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत घोटी पोलिस ठाण्यात सदर महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची महिला बसमध्ये कुठून बसली तिच्यासोबत प्रवासी कोण होते याबाबतचे पोलिस अधिकाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल…
दरम्यान बसमध्ये गोंधळ घालणाऱ्या या महिलेच्या व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला आहे. सोशल मीडियावर शेअर देखील केले जात आहे.