मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. तसेच बॉलिवूडपासूनही ती दूर आहे. निर्माता दिग्दर्शकांच्या अवास्तव मागण्यांमुळ चित्रपटांना रामराम ठोकावा लागला.पण सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. जे अनेकदा व्हायरलही होतात. दरम्यान मल्लिकानं एक धक्कादायक किस्सा शेअर केलाय.
मल्लिकानं बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवर अनेकदा भाष्य केलंय. मल्लिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असाच एक धक्कादायक खुलासा करत जुना किस्सा सांगितला आहे. कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव शेअर करताना मल्लिका म्हणाली की, या सर्व गोष्टींना नकार दिल्यानं तिच्या हातातून मोठे प्रोजेक्ट गेले होते. मोठ्या हिरोंनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. कारण मी कोणतीही तडजोड करत नव्हते.
मी इतरांच्या तालावर नाचू शकत नाही, त्यांच्या इच्छेनुसार वागले नाही. कास्टिंग काऊचबद्दल बोलताना मल्लिका म्हणाली की, तुम्ही जर एखाद्या चित्रपटामध्ये काम करत असाल आणि त्यातल्या हिरोनं तुम्हाला रात्री तीन वाजता कॉल करून घरी बोलवलं तरी तुम्हाला जावं लागतं, तुम्ही नाही गेलात तर, तो प्रोजेक्ट हातातून गेलाच म्हणून समजा’.
आणखी एक किस्सा सांगताना मल्लिका म्हणाली की, ‘निर्माता-दिग्दर्शकांच्या मागण्या अवास्तव असतात. मी एक गाणं करत होते. त्यात मी किती हॉट आहे हे दाखवण्यासाठी निर्मात्याला भन्नाट कल्पना सुचली. माझ्या पोटावर ऑम्लेट केलेलं दाखवावं असा निरोप त्यानं नृत्यदिग्दर्शकाकरवी पाठवला. तो ऐकून मी उडलेच. विशिष्ट इमेजमुळं अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं. पुढं मी अशाच कारणास्तव चित्रपटांमधून बाजूला झाले. मी चित्रपटात आले तेव्हा मला कशा भूमिका द्याव्यात हे अनेकांना कशत नव्हतं. मी चुंबनदृश्य द्यायला तयार होते. स्वतःच्या शरीराबद्दल मला न्यूनगंड नसल्याने मी बोल्ड भूमिका करायला तयार होते. त्यातून माझी इमेज तयार होत गेली. मी जे काम केलं, त्याची खंत वाटत नाही.’