मुंबई : महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत कोश्यारींच्या विधानाचा समाचार घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
“महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याचं त्यांना गरज आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
हे पण वाचा :
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी : बंद असलेल्या सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचे आदेश
क्या बात है ! शिपायाला 8 लाख रुपये पगार, आठवड्यातून 2 दिवस सुट्टी अन् ओव्हरटाइमचे पैसे वेगळे
हे सरकार केव्हाही कोसळू शकते ; खडसे यांचे मोठ वक्तव्य
Video : महाराष्ट्रातून ‘गुजराती-राजस्थानी हटवलं तर.. राज्यपालांच्या वक्तव्याने पुन्हा नवीन वाद
तसेच राज्यपालांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायची, याबद्दल विचार करण्याची वेळ आली असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम कोश्यारींनी केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्या महाराष्ट्राचं मीठ खाल्लं तिथेच नमकहरामी केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.