मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील आक्रमक झाल्या आहेत. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या
“राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण माहाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची वेळ येते. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं विधान राज्यपाल करत आहेत. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
हे पण वाचा :
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी : बंद असलेल्या सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचे आदेश
क्या बात है ! शिपायाला 8 लाख रुपये पगार, आठवड्यातून 2 दिवस सुट्टी अन् ओव्हरटाइमचे पैसे वेगळे
हे सरकार केव्हाही कोसळू शकते ; खडसे यांचे मोठ वक्तव्य
Video : महाराष्ट्रातून ‘गुजराती-राजस्थानी हटवलं तर.. राज्यपालांच्या वक्तव्याने पुन्हा नवीन वाद
दरम्यान, राज्यपालांच्या विधानावरून सगळ्याच पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज एक वाजता ही पत्रकार परिषद होणर आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद-आज दुपारी मातोश्री येथे1 वाजता”, असं ट्वि़ट राऊतांनी केलं आहे.