नवी दिल्ली : जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ दिसून येत आहे. यापूर्वी 27 जुलै रोजी सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या वाढत्या किमतीने पुन्हा जोर पकडला. या आठवड्यात सोन्याचा भाव 1200 रुपयांनी वाढला असून सोन्याचा भाव 52 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.
जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24-कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 96 रुपयांनी वाढून 51,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, तर MCX वर सकाळी चांदीचे वायदे 418 रुपयांनी वाढून 58,037 रुपये प्रति किलोवर पोहोचले. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,490 रुपयांवर सुरू झाला होता, तर चांदीचा व्यवसाय 57,830 रुपयांवर सुरू झाला होता.
जागतिक बाजारपेठेतही भाव वाढले
आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट किंमत 1,762.02 डॉलर प्रति औंस, तर चांदीची स्पॉट किंमत 20.08 डॉलर प्रति औंस होती. म्हणजेच जागतिक बाजाराचा परिणाम आज सोन्या-चांदीच्या भावावरही दिसून येत आहे.
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,100 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,380 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 565 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
तुम्ही स्वतः नवीनतम दर देखील तपासू शकता
तुम्हाला सोन्या-चांदीचे रोजचे नवीनतम दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही घरबसल्या ही माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर लवकरच, तुम्हाला मोबाईल फोनवर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये देशातील सोन्या-चांदीच्या नवीनतम दरांची माहिती दिली जाईल.