जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत अखेर आज गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या ७७ गटांची आरक्षण सोडत जाहीर झाली.
नव्याने काढण्यात आलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार जिह्यातील जिल्हा परिषदेच्या ७७ गटांचे आरक्षण सोडत गुरुवार दि. 28 रोजी पार पडले. दरम्यान, आरक्षण कोणत्या गटात कसे पडेल याचे तर्कवितर्क इच्छूकांकडून लावले जात होत. तर आरक्षण कसे पडेल तिकीट आपल्यालाच कशी मिळेल यासाठीची देखील इच्छूकांनी तयारी केलेली होती.
जिल्हा परिषदेच्या ७७ गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले असून यात अनु. जाती एकुण जागा ७ – ४ महिला, अनु. जमाती १५- ८ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग १६ – ८ महिला, सर्वसाधारण ३९ – १९ महिला असे आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
लैंगिक गैरवर्तन, मिठी मारण्यासह आता चुंबनावरही बंधने ; मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी
4 मुलांची आई 14 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली, दोघेही प्रेमात घर सोडून बेपत्ता; मग…
50 कोटींहून अधिक रोख, 3 सोन्याच्या विटा; अर्पिताच्या फ्लॅटमधून आतापर्यंत काय मिळाले?
महाराष्ट्र हादरला ; पैशांचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर नऊ जणांचा वारंवार बलात्कार
या प्रक्रियेवेळी महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे ह्या उपस्थित होत्या. तसेच ग्रामीण भागातील उमेदवार आणि त्यांचे समर्थकांनीही सोडतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती.