दहिगाव : काही दिवसापूर्वीच बोदवड येथे एटीएम फोडल्याची घटना ताजी असताना यावल तालुक्यातील दहिगाव येथे अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँकचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री उघडकीस आलीय. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका संशियतास त्यांनी ताब्यात घेतले आहे. एटीएमच्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतलेला आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तो तोडलेला आहे. एटीएम मशीनचे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत.
पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तपासणी करून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. घटनास्थळी पंचनामा फौजदार सुदाम काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी केला. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या दरवाजाचे कुलूपही गेल्या आठवड्यामध्ये चोरटयांनी तोडलेले असल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात चार ते पाच वर्षांपूर्वी संगणक कक्ष तोडण्यात आला होता. तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे.
हे पण वाचा :
लैंगिक गैरवर्तन, मिठी मारण्यासह आता चुंबनावरही बंधने ; मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी
4 मुलांची आई 14 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली, दोघेही प्रेमात घर सोडून बेपत्ता; मग…
50 कोटींहून अधिक रोख, 3 सोन्याच्या विटा; अर्पिताच्या फ्लॅटमधून आतापर्यंत काय मिळाले?
महाराष्ट्र हादरला ; पैशांचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर नऊ जणांचा वारंवार बलात्कार
हे चोरटे नेमके कुठले व काय याची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे. तसेच गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी कर्मचारी रहिवासी व्हावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात. एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी करीत आहेत.