मुंबई : कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरून इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत महिलांचे संकलन असलेल्या ‘आघाडीच्या श्रीमंत महिलांची यादी जारी केली. यामध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. एकूण ८४ हजार कोटींच्या संपत्तीसह मल्होत्रा या यादीत अव्वल स्थानावर आहेत. याशिवाय किरण मुझुमदार शॉ, फाल्गुनी नायर, वंदना लाल, रेणू मुंजाल यांचीही नाव आघाडीवर आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा हिने सलग दुस-या वर्षी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर फाल्गुनी नायर ही देशातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला आणि जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला आहे. रोशनी नाडर ही देखील सूचीबद्ध IT कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला आहे. लीना गांधी तिवारी या यादीतील सर्वात दानशूर महिला आहेत, ज्यांनी आरोग्य सेवेसाठी 24 कोटी रुपये दान केले आहेत. नेहा नारखेडे या यादीतील सर्वात श्रीमंत नवीन सदस्य आहेत.
हे पण वाचा :
अन् शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ही मागणी, ऐका दोघांमधील संवाद
मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे मोठे निर्णय
1 ऑगस्टपासून बदलणार हे नियम ; थेट परिणाम तुमच्यावर जीवनावर होईल
प्रकाशित करण्यात आलेल्या यादीनुसार HCL टेक्नॉलॉजीजच्या रोशनी नादर मल्होत्रा या अव्व्ल असून त्यांची संपत्ती 84,330 कोटी इतकी आहे. त्यानंतर Nykaa च्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती आहे 57,520 कोटी रुपयेस, मग किरण मुझुमदार-शॉ 29,030 कोटी रुपयांसह तिस-या क्रमांकावर आहेत, तर Divi’s Laboratories’s च्या निलिमा यांची 28 हजार 180 कोटी, Zoho’s च्या राधा वेम्बूची 26,620 कोटी, USV च्या लीना गांधी तिवारींची संपत्ती आहे 24,280 कोटी, तर मेहेर अॅने 14,530 कोटी, न्यू कॉन्फ्लुएंट्सच्या नेहा नारखेडे 13,380 कोटी, डॉ लाल पॅथलॅब्सच्या वंदना लाल रु. 6,810 कोटी आणि हिरो फिनकॉर्पच्या रेणू मुंजाल रु. 6,620 कोटी या यादीत आहेत.