मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात धो-धो पाऊस बरसला. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. दरम्यान, काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये कोसळतो आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढच्या दोन-तीन दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. शिवाय मुंबई, ठाणे विभागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत अशी ही माहिती हवामान खात्याने दिली असल्याचे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.
राज्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
आज दिनांक 27 रोजी राज्यातल्या काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे तर इतर भागाला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये.
27 July, राज्यात ह्या 2,3 दिवसात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत ???????? पावसाची शक्यता.
इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाउस. ⛅????
मुंबई ठाणे भागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत…
-IMDFor detail info pl visit IMD websites
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2022
दिनांक 28 रोजी मात्र अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला या भागात उद्या म्हणजेच 28 तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.