मुंबई : जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांदरम्यान, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याचा भाव पुन्हा एकदा 50,500 रुपयांच्या वर पोहोचला आहे.
जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सचा भाव 16 रुपयांनी वाढून 50,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा वायदा सकाळी 85 रुपयांनी वाढून 54,492 रुपये प्रति किलो झाला. याआधी सोन्याचा व्यवहार ५०,५९८ रुपये, तर चांदीचा व्यवहार ५४,६१० रुपये प्रति किलोने सुरू झाला. मात्र यानंतर मागणी कमी झाल्याने दोन्ही धातूंचे भाव लवकरच खाली आले. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढले आहे.
महाराष्ट्र्रातील बड्या शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,160 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
हे पण वाचा…
राजकीय भूकंप होणार ; भाजपचे १६ आमदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?
अभिनेता रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?
अति भयंकर ! मंदिरासमोर झोपलेल्या यात्रेकरूंना मिनी ट्रकने चिरडलं, घटनेचा Video समोर
आपण दर देखील तपासू शकता
तुम्हालाही सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.