जळगावः चाळीसगावमार्गे मुंबईला निघालेल्या पाटलीपुत्र एक्सप्रेसला मोठा अपघात होता होता टळला आहे. सुसाट धावणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेसचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेले तर रेल्वेचे अर्धे डब्बे मागेच राहिले. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळ घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
पाटलीपुत्र एक्सप्रेसला आज मोठा अपघात झाला असता मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव मार्गे मुंबईला जात असताना या धावत्या एक्सप्रेसचे अर्धे डबे हे रेल्वे इंजिनबरोबर पुढे गेले तर तुटलेले मागे घेऊन ते पुन्हा जोडण्यात आले.
रेल्वे तीन किलोमीटर लांब गेली
त्यानंतर डब्यांचीही तपासणी करण्यात आली. मुख्य इंजिनबरोबर अर्धे डबे दोन ते तीन किलो मीटर लांब गेले होते, त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
हे पण वाचा…
राजकीय भूकंप होणार ; भाजपचे १६ आमदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?
अभिनेता रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?
अति भयंकर ! मंदिरासमोर झोपलेल्या यात्रेकरूंना मिनी ट्रकने चिरडलं, घटनेचा Video समोर
पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेचे इंजिनला सर्वे डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.