मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्यावरती काही लोकांकडून टिकेची झोड उडाली आहे. तर काही लोक रणवीरचे समर्थ करण्यास मैदानात उतरल्याचे चित्र देखील आहे. रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंद करण्यात आलायं. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती मिळतंय. यामुळे रणवीरच्या अडचणीमध्ये वाढ होणार हे नक्की आहे.
अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.
हे पण वाचा…
अति भयंकर ! मंदिरासमोर झोपलेल्या यात्रेकरूंना मिनी ट्रकने चिरडलं, घटनेचा Video समोर
काय सांगता.. तो चक्क ५ वर्ष नुसता पादतोय! आता तब्बल 1 कोटीचा दावाच ठोकलाय
नोकरीची मोठी संधी : या बँकेत विविध पदांसाठी भरती, ३०००० रुपये पगार मिळेल
आता राष्ट्रवादीलाही मोठा झटका ; दोन आजी माजी आमदार भाजपच्या वाटेवर