मुनिराबाद : रस्त्यावर झोपलेल्या अनेक यात्रेकरूंना एका मिनी मालट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कोप्पल तालुक्यातील मुनिराबाद शहरात घडलीय. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा हुलीगेम्मा मंदिरासमोर घडली आहे.
काय घडले नेमके ?
या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव थिप्पाण्णा असे आहे. तर इतर तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (vehicle ran over the sleeping persons) कैद झाली आहे. या अपघातानंतर (vehicle ran over the sleeping persons) आजूबाजूच्या लोकांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. मात्र, तोपर्यंत चालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता.
मंदिरासमोर झोपलेल्या नागरिकांना गाडीने चिरडलं, धक्कदायक व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/5hqqF5s4Mr
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 25, 2022
व्हिडिओमध्ये काय आहे ?
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, वाहनाच्या मागे उभ्या असलेल्या काही लोकांसह एक मिनी मालट्रक रस्त्याच्या कडेला झोपण्याच्या तयारीत असलेल्या किमान आठ यात्रेकरूंकडे हळू हळू येताना(vehicle ran over the sleeping persons) दिसला. त्यांच्यापैकी काहींना वाहन त्यांच्या दिशेने येताना दिसले आणि त्यांनी तिथून दुसऱ्या बाजूला उडी मारली. मात्र, काही जण यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे परिणामी एकाचा मृत्यू आणि इतर जण जखमी (vehicle ran over the sleeping persons) झाले. तसेच यात्रेकरूंना खाली उतरवल्यानंतर चालक वेगाने पळताना दिसत आहे. याप्रकरणी मुनिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चालकाचा शोध सुरु आहे.