नवी दिल्ली । आपण अनेक वेगवेगळ्या घटना वाचल्या असतील. पण आताची घटना वाचून तुम्ही काहीसे चकित व्हाल. एका 46 वर्षांच्या व्यक्तीने नाताळमध्ये एका सॅन्डविच (Sandwich) खाल्लं होत, पण आता जिथून सॅन्डविच खाल्लं होतं, त्या सॅन्डविचच्या स्टॉलवर एक कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. कारण सॅन्डविच खाल्ल्याच्या अवघ्या काही तासांनी या माणसाचं पोट बिघडलं. त्याच्या पोटातून सारखा गॅस बाहेर पडत होते. अचानक तो पादू (Farting) लागला. नको त्या ठिकाणीही ही गोष्ट घडत होती. याने हा व्यक्ती असह्य झाला. पाच वर्ष झाले या व्यक्तीचं पादणं काही थांबलं नाही. अखेर या व्यक्तीनं त्या सॅन्डविच वाल्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. हा सगळा प्रकार घडला इंग्लंडमधील एका शहरात. चिप्पेनहम नावाचं एक शहर आहे. या शहरात एक ख्रिश्चन धर्मगुरु राहतात. चिप्पेनहम शहर इंग्लंडमध्ये आहे. 46 वर्षीय टायरॉन प्रदेस यांनी एका स्टॅन्डविचच्या दुकानावर दावा ठोकलाय. थोडा थोडका नाही, तर तब्बल एक कोटी रुपयांचा दावा त्यांनी ठोकला. पाच वर्ष पादण्याचा त्रास टायरॉन यांना होतो आहे. या त्रासाने ते मेटाकुटीला आले आहे. पादण्यावर पाच वर्ष कोणतंच नियंत्रण न राहिल्यानं त्यांना अनेकदा लाजीरवाण्या प्रसंगांना समोरं जावं लागतंय. सार्वजनिक जीवनात त्यांना या त्रासामुळे जगणं असह्य झालंय. कधी खाल्लं होतं सॅन्डविच? 2017 साली नाताळदरम्यान, फादर टायरॉन हे एका सॅन्डविच स्टॉलवर गेले होते. तिथे त्यांनी हॅम रोल म्हणजे एक प्रकारचं सॅन्डविच खाल्लं. हे हॅम रोल खाल्ल्यानंतर काही तासांतच त्यांचा पोटात दुखू लागलं आणि त्यांच्या पोटातून गॅस बाहेर येऊ लागला. त्यांना पादण्याचा त्रास सुरु झाला. हा त्रास गेली पाच वर्ष झाले थांबलेलाच नाही. आपल्या पत्नी आणि मुलांसोबत असताना त्यांना नाताळदरम्यान हॅम रोलचं सेवन होतं होतं. आयरीश मिररने याबाबतचं वृत्त दिलंय. आपल्याला हा त्रास हॅम रोलमुळेच झाला असा आरोप करत टायरॉन यांनी अखेर स्टॉलविरोधात तब्बल दोन लाख पाऊंड्स म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे जवळपास दीड कोटी रुपयांच्या आसपास इतक्या किंमतीचा दावा ठोकला आहे. आता हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं असून कोर्टासमोर सुनावण्या सुरु झाल्या आहेत. हे पण वाचा… नोकरीची मोठी संधी : या बँकेत विविध पदांसाठी भरती, ३०००० रुपये पगार मिळेल आता राष्ट्रवादीलाही मोठा झटका ; दोन आजी माजी आमदार भाजपच्या वाटेवर अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ आता कोर्टाची लढाई टायरॉन यांच्या वकिलांनी कोर्टासमोर युक्तिवाद करताना म्हटलंय, की टायरॉन यांचा त्रास असद्य करणारा असून तो अनेकदा जगण्यातही अडथळे आणतोय. पादणं आता त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलंय. ते रोखता येणंही त्यांना अशक्य होतंय. त्यामुळे त्यांना अवघडलेल्या परिस्थितीतून त्यांना सध्या जावं लागतंय. यामुळे त्यांची झोपही मोडतेय. आणि पोटदुखीनं त्यांचं जगणं मुश्किल केलंय.