मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात (CSMT) हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बंपरला धडकून रुळांवरून घसरली. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील काही लाद्याही तुटल्या. त्यामुळे सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सध्या हार्बर रेल्वेमार्गावरील एकाच बाजूची वाहतूक सुरु आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
हा अपघात नेमका कसा झाला, याची कारण अद्याप समजलेले नाही. सध्या लोकल ट्रेन रुळावर आणून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेत हार्बर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हे पण वाचा…
नोकरीची मोठी संधी : या बँकेत विविध पदांसाठी भरती, ३०००० रुपये पगार मिळेल
आता राष्ट्रवादीलाही मोठा झटका ; दोन आजी माजी आमदार भाजपच्या वाटेवर
अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ