बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. सिटीझन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट citizencreditbank.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर
वयो मर्यादा:
उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षे आणि प्रोबेशनरी असोसिएट पदांसाठी 20 ते 26 वर्ष असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावी. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.
निवड प्रक्रिया
अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएटच्या पदांवर भरती केली जाईल. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या परीक्षेत तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता, इंग्रजी, बँकिंग आणि सामान्य जागरूकता, परिमाणात्मक आणि संख्यात्मक क्षमता या विषयावर एकूण 200 गुणांचे 160 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटं दिली जातील.
वेतन
प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी 30,000 रुपये आणि प्रोबेशनरी असोसिएटसाठी 20,000 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील तपासू शकतात.