पुणे : धावत्या झेलम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असलेल्या पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांनी 14 वर्षांच्या एका अनाथ मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक समोर आलीय. याप्रकरणी तिघांना पुणे जीआरपीने अटक केली आहे. 19 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 मिनिटांची बलात्काराची ही घटना घडली. भुसावळ रेल्वे पोलिसांनी या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. झेलम एक्स्प्रेसमध्ये ही संतापजनक घटना घडल्याचं उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडालीय.
कधीची घटना?
भोपाळहून झेलम एक्स्प्रेस ट्रेन पुण्याच्या दिशेने जात असताना 14 वर्षांच्या मुलीसोबत गाडीच्या पॅन्ट्रीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने हैवानी कृत्य केलं. ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा पीडितेला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं होतं. पीडितेची जेव्हा सामाजिक संस्थेनं चौकशी केली, त्यानंतर या हैवानी कृत्याबाबत पीडितेनं खुलासा केला. त्यानंतर एनजीओच्या मदतीने पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि अखेर तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
हे पण वाचा :
अरे वा..! Splendor+ची ‘ही’ बाईक ब्लूटूथ, USB चार्जरसह येतेय ; जाणून घ्या किमती?
बापरे.. 23 दिवसांमध्ये जळगावसह राज्यातील 89 शेतकऱ्यांनी संपविले जीवन
जळगाव शहर पुन्हा हादरले; तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून
अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीचा संधी.. त्वरित करा अर्ज
भुसावळ रेल्वे स्थानकात एक अल्पवयीन अनाथ मुलगी आढळून आली होती. या मुलीसोबत सामाजिक संस्थेच्या काही लोकांनी संवाद साधला. त्यानंतर पीडितेनं सांगितलेला घटनाक्रम ऐकून सगळेच हादरुन गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी विनातिकीट झेलम एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होती. ती एका एसी कंम्पार्टमेन्टमध्ये असताना तिची पॅन्ट्रीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चौकशी केली.