मुंबई : राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दाखल गुन्हे पोलिसांच्या हातून काढून सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता भाजप नेते गिरीष महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधात दाखल गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे महाविकास विकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यापासून जुन्या सरकारला एकापाठोपाठा एक धक्के दिले जात आहेत. शिंदे सरकारने गेल्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तसंच अनेक ठिकाणचा निधीही रोखला आहे. आता अशातच राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधात खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा कोथरूड पोलिस ठाणे दाखल झालेला गुन्हा आणि फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
अबब.. मंत्र्यांच्या घरात कोट्यवधींच्या कॅशचा ढीग पाहून अधिकारी झाले हैराण
जळगावच्या महापौरांनी केला शिंदे गटावर खळबळजनक आरोप
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ; बँकेने दिली ही गुडनूज
खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 29 आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआयला करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला तपास हस्तांतरित करण्याचे आदेश मिळाले आहेत. परंतु प्रक्रियेनुसार सीबीआयला ते स्वीकारावे लागेल आणि त्यानंतर केस आणि पेपर त्यांच्याकडे सोपवले जातील.