जळगाव : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे सध्या शिव संवाद यात्रा करत आहेत. या यात्रेचा आज दुसरा दिवस असून आज ते नाशिक जिल्ह्यात असून मनमाडमध्ये ते शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. मात्र यावरून आता शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
आज आमच्या उद्धवसाहेबांना शाखेवर जावं लागतंय, विनामास्क जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. मला असं वाटतं हेच जर मागील काळात केलं असतं तर जी आमची शिवसेना मजबूत आहे ती आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांची ही शिवसेना अधिक मजबूत व्हावी म्हणून आम्ही हा उठाव केला आहे. या उठावाच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करु, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
हे पण बघा..
भरधाव रुग्णवाहिका टोलनाक्याला धडकली, 3 जण ठार, घटनेचा भयानक VIDEO समोर
जळगाव युवसेनेला भगदाड ; २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नाथाभाऊंच्या शुभेच्छा.. अनेकांच्या भुवया उंचावल्या
धक्कादायक ! काका-काकूने पर्सनल डायरी वाचली, अन् उच्चशिक्षित तरुणीने उचलले टोकाचं पाऊल
दरम्यान, आज जळगावातील युवासेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेना पक्षश्रेष्ठीवर नाराजी व्यक्त करत युवासेनेच्या विविध पदाचे राजीनामे दिले. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल परदेशी यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.