बेंगळुरू: कर्नाटकातील बिंदूरजवळील टोल प्लाझा येथे वेगवान रुग्णवाहिकेचा अपघात होऊन एका रुग्णासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अपघाताचे हे दृश्य पाहून सर्वजण हादरले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पावसात टोलचे कर्मचारी बॅरिकेड्स काढण्यासाठी धावत आहेत. दरम्यान, वेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेचे नियंत्रण सुटले आणि ओल्या रस्त्यावर आदळली आणि टोल बूथच्या केबिनला धडकली.
Shocking accident of an ambulance at toll plaza in Udupi, Karnataka, 4 people injured pic.twitter.com/0vmuofGLa2
— Arshdeep Samar (@summerarshdeep) July 20, 2022
रिपोर्टनुसार, ही रुग्णवाहिका कुंदापुरा येथून होन्नावरा येथे एका रुग्णाला घेऊन जात होती. ही घटना आज संध्याकाळी उडुपीच्या बिंदूर तालुक्यातील शिररु गावात NH 66 वर घडली.