जळगाव । एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. त्यांच्या या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे राज्यात सर्वत्र शिवसेनेचे दोन गट पडलेत. ठाकरे आणि शिंदे गट. शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड पडले. युवसेनेचा एक मोठा गट फुटला असून ५० पेक्षा अधिक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.
पक्षात आमच्यावर अन्याय होत असून आम्ही त्यामुळे २०० पदाधिकारी पदाचे राजीनामे देत आहोत, असे युवासेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
हे पण बघा..
देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नाथाभाऊंच्या शुभेच्छा.. अनेकांच्या भुवया उंचावल्या
धक्कादायक ! काका-काकूने पर्सनल डायरी वाचली, अन् उच्चशिक्षित तरुणीने उचलले टोकाचं पाऊल
अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
शिंदे सरकारचा पुन्हा दे धक्का ; 600 कोटींच्या कामांना स्थगिती
युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, महानगर प्रमुख स्वप्नील परदेशी, तालुका प्रमुख चेतन पाटील यांच्यासह जवळपास ८० पदाधिकारी सध्या सोबत असून २०० पदाधिकारी यांनी राजीनामा देत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ.गुलाबराव पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगितले. अजिंठा विश्रामगृह येथे युवासेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.