जळगाव : एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर सगळेच जाणतात. पण कितीही वैर असले तरी एकमेकांना खुल्या मनाने शुभेच्छा दिल्या जातात. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत जाहीरपणे फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाही एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय खच्चीकरण केले, मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, असे गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केले होते. आता विधानपरिषेवर निवडून गेल्यानंतरही सभागृहात एकनाथ खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसेंच ट्विट
“राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फणडवी जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं ट्विट करत खडसेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही खडसेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री @Dev_Fadnavis जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन ! pic.twitter.com/jNeUFmGmBU
— Eknath Khadse (@EknathGKhadse) July 22, 2022