मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन अडीच वर्षात अनेक सण निर्बंधात साजरे करावे लागले होते. यंदा मात्र सरकारने धुमधडाक्यात हे सण साजरे करण्यास परवानगी देऊन टाकली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीला यावर्षी कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त पत्रकार परिषद घेत दिलं. विशेष म्हणजे गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दहीहंडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले गेले पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सण मोकळेपणाने साजरे होणार
कोविडमुळे सण साजरे करता आले नाहीत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखून शांततेत सण साजरे झाले पाहिजेत याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनालाही सूचना दिल्या. गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजे यासाठी खेटे घालायला लागू नये यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
हे पण वाचा :
Altoचे सर्वात स्वस्त मॉडेल फक्त 3.39 लाखात, मायलेजही देते जबरदस्त
राष्ट्रपती झाल्यावर किती पगार मिळतो? आणि कोण-कोणत्या सुविधा मिळतात, जाणून घ्या
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. सोने वर्षभरातील नीचांकी पातळीवर
मुख्यमंत्री शिंदेंनी पाचोऱ्यातून निवडणूक जिंकून दाखवली तर.. संजय सावंतांची घणाघाती टीका
उंचीची मर्यादा हटवली
या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. खड्डे खोदण्यासाठी पैसे घेतात. मंडपाचे चार्जेस यातून सवलत दिली आहे. तसेच मंडळांकडून हमी पत्र घेत होते. ते घेण्यास मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असं सांगितलं. नियमांचं पालनं करावं लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.