मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. पक्षांविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची शिवसेनेकडून हकालपट्टी केली जातेय. अशातच आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून त्यांनी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच सहसचिव किरण साळी यांनाही आदित्य ठाकरे यांनी काढून टाकलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच सहसचिव किरण साळी यांनाही आदित्य ठाकरे यांनी काढून टाकलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
कोण आहेत किरण साळी?
युवासेनेचे पुण्यातील मोठे नेते म्हणून किरण साळी यांची ओळख आहे. किरण साळी हे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांचे खंदे समर्थक मानले जातात. उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातून युवासेनेत फूट पडणार हे निश्चित मानलं जातं होतं आणि त्याप्रमाणे साळी यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होणं पसंत केलं.
हे पण वाचा :
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. सोने वर्षभरातील नीचांकी पातळीवर
मुख्यमंत्री शिंदेंनी पाचोऱ्यातून निवडणूक जिंकून दाखवली तर.. संजय सावंतांची घणाघाती टीका
अजय देवगणच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर घालताय धुमाकूळ, तुम्ही फोटो पाहिलेत का?
जळगावात तरुणाच्या हत्येने खळबळ, तीन जणांना घेतले ताब्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी नुकताच पुणे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्तांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी किरण साळी यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होत साळी यांची हकालपट्टी केली आहे.