मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेलची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबतचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयानेही या बातमीला दुजोरा दिला आहे. पण फक्त राष्ट्रीय पातळीवरील सेल आणि विभाग बरखास्त केले आहेत. राज्यातील सेल आणि विभागाबाबत हा निर्णय घेण्यात आला नाही.
प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांनतर याबाबत ट्विट करत म्हंटल की , आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने, सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेल (महिला काँग्रेस वगळून ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकारणी तात्काळ बरखास्त करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री शिंदेंनी पाचोऱ्यातून निवडणूक जिंकून दाखवली तर.. संजय सावंतांची घणाघाती टीका
अजय देवगणच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर घालताय धुमाकूळ, तुम्ही फोटो पाहिलेत का?
जळगावात तरुणाच्या हत्येने खळबळ, तीन जणांना घेतले ताब्यात
बँकेत नोकरीची मोठी संधी…तब्बल 6000 हून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
नेमकं कारण काय असू शकते-
राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे हा निर्णय का घेतला हे समजू शकले नाही मात्र विविध निवडणुकींच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सगळे सेल देखील बरखास्त करण्यात आल्याची शक्यता आहे.