जळगाव, प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक छोटे मोठे प्रकल्प भरले आहेत. दरम्यान, पाल येथील सुखी गारबर्डी धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
स्थानिक कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. जर पाण्याचा प्रवाह अजून वाढला तर हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी तात्काळ संबंधित यंत्रणेला कळविण्याची विनंती पाटबंधारे विभागाचे सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी आपत्ती व्यवस्थापनाला केली आहे.
याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आवश्यक साहित्य व मनुष्यबळासह घटनास्थळी धाव घेतली आहे. धुळे येथील SDRF चे पथक बचावकार्यासाठी मागविण्यासाठी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आले आहे.