नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटांच्या कारखान्याच्या व्यवस्थापकाने पत्नीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर मुलीला गुंगीचं विषारी औषध पाजलं. त्यामुळे या मुलीची प्रकृती खालावली. अखेर तिला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं होतं. या मुलीची प्रकृती थोडी बरी होऊ लागल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला असून अधिक तपास केला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील नांगलोई भागातील आहे. एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात ही तरुमी काम करते. जय प्रकाश नावाचं एक व्यक्ती या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला होता. माझी बायको आजारी आहे, असं म्हणून अल्पवयीन पीडितेला कारखान्याच्या मॅनेजरने आपल्या घरी नेलं. घरी गेल्यानंतर बायकोसमोर त्याने या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर पीडितेला जय प्रकाशने बिषारी द्रव्य पाजलं आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडलं. पीडिता आपल्या घरात गेल्यानंतर बेशुद्ध झाली होती.
हे पण वाचा..
अंगावर काटा आणणारी घटना ; तरुणाचा पाण्यात वाहून जातानाचा Video व्हायरल
दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..
अभ्यास न करत असल्यानं आईने मारले, वडिलांनी विचारले का रडतोस, मुलगा म्हणाला.. पहा Video
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठं खिंडार? ‘हे’ दोन्ही खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार?
दरम्यान, पोलिसांनी एनजीओसमोर या मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसंच एफआयआरही दाखल केलाय. या बलात्कार प्रकरणी आरोपी जय प्रकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची कसून चौकशी केली जातेय. तर सध्या त्याची बायको फरार असून तिलाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वाय पोलिसांनी व्यक्त केला आहे.