यवतमाळ : यवतमाळच्या बेंबळा धरण जवळ एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाचा पाण्यात पोहोताना व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये तरुण पाण्यात पोहताना दिसतो. पण त्यानंतर बघता बघता तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातो. सचिद बडोद असे या तरुणाचे नाव आहे. तरुणाचा पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचं धाडस करणाऱ्यांनी शंभरवेळा विचार करण्याची गरज यानिमित्तानं व्यक्त केली जातेय.
यवतमाळच्या बेंबळा धरण प्रकल्पात सचिन पोहण्यासाठी उतरला. त्यासोबत त्याचे इतर मित्रही धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. सचिन आधी खोलवर डुबकी लगावत होता. व्हिडीओमध्ये तो पाण्याच्या मध्यभागी असल्याचं दिसून येतं. पावसाचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सचिनला पुढे आपण वाहून जाऊ, अशी कोणतीही शक्यता वाटत नव्हती. पण नेमकं तेच घडलं.
https://twitter.com/ssidsawant/status/1548567932749631488
घटना कॅमेऱ्यात कैद
मित्रांचा पोहतानाचा व्हिडीओ किनारी उभा असलेला एक मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. नेमक्या याच व्हिडीओ सचिन वाहून जाताना कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनं सगळ्यांना धक्का बसला. तर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले मित्रही धास्तावले. सचिन वाहून जाण्याआधी एक मित्र नुकताच पाण्यातून बाहेर आलेला असतो. तो कठड्यावरुन सचिनला बाहेर काढण्यासाठी धडपडत असल्याचंही दिसतं. पण तोपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढतो. सचिनला पाण्याच्या वाढत्या प्रवाहाचा अंदाज येत नाही. तो प्रवाहासोबत खेचला जातो आणि बघता बघता पाण्यात गायब होऊन वाहून जातो.