जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदी पात्रात न जाण्याचा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र गिरणा नदीत पोहोण्याचा मोह एका मुलाच्या जीवावर बेतला. गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी एक मुलगा बुडाला. तिघांना गावकऱ्यांनी वाचवले. बुडालेल्या मुलाचा शोध सुरू होता. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
काय आहे नेमकी घटना?
शिवाजीनगरातील यश पप्पू भालेराव (वय १४), प्रेम परशुराम झांझळ (वय १५), मयूर संतोष सपकाळे (वय १५) व विशाल हिलाल जोहरे (वय १६) असे चौघे शनिवारी भोकणीजवळ गिरणेत पोहायला गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडत होते. हा प्रकार नदीकाठावरील ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी यश, परशुराम व प्रेम यांना पाण्यातून बाहेर काढले; पण विशाल मात्र बाहेर निघू शकला नाही. प्रयत्न केल्यानंतरही तो गाळात, डोहात अडकला.
हे पण वाचा..
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठं खिंडार? ‘हे’ दोन्ही खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार?
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात लवकरच 30 रुपयाची घसरण होणार
प्लॅटफॉर्मवरून थेट रेल्वे रुळावर पडला, तेव्हड्यात भरधाव येत होती ट्रेन, मग….पहा व्हायरल Video
जळगावात शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे गजानन महाजन, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदणकर, प्रवीण सुरवाडे, तालुका पोलिस ठाण्याचे संजय भालेराव, तहसील व अग्निशमनचे लोक घटनास्थळी पोहोचले. शनिवारी बांभोरीचा बाजार असल्याने अग्निशमनचे वाहन अडकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या रस्त्याने घटनास्थळ गाठले.