नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्यांना महागाई आणखी एक मोठा धक्का बसणार आहेत. GST परिषदेने घरगुती वापराच्या अनेक वस्तूंवर येत्या १८ जुलैपासून GST लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पॅकेज केलेले आणि लेबल केलेले गव्हाचे पीठ, दूध, चीज, ताक, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीडीटी) ही शिफारस सोमवारपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पॅकेज केलेले ब्रँडेड दूध उत्पादने महाग होणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या वस्तूंवरील सूट संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागणार आहे. मात्र, ज्या वस्तू पॅक केलेल्या नाहीत किंवा कोणत्याही ब्रँडमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना जीएसटीमधून सूट दिली जाईल.
काय महाग होईल
प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, पनीर, मध आणि धान्य यांच्यावरील जीएसटी सूट आता रद्द करण्यात आली आहे. या वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल.
सोमवारपासून चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
आता 5,000 रुपयांच्या वर असलेल्या रुग्णालयाच्या खोलीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. यावर ५ टक्के जीएसटीभरावा लागेल.
मॅप, अॅटलस आणि ग्लोबवर १२ टक्के दराने जीएसटी लागू होईल.
एलईडी लाईट, फिक्स्चर आणि एलईडी दिवे यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. आता यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यापूर्वी या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी होता.
हे पण वाचा..
दिशा पटानी ‘हा’ बोल्ड अवतार पाहिलात का? पहा हे फोटो
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा
ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे इत्यादींवरील जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे.
छपाई, लेखन किंवा शाई
इलेक्ट्रिक वॉटर पंप आता महाग होणार आहेत. सायकल पंपाची किंमतही वाढणार आहे. आता त्यांच्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे
गिरण्या, पवनचक्की, पाणचक्की यांमधील धान्याची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांना अधिक जीएसटी भरावा लागेल.
अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी यंत्रे आणि डेअरी उद्योगात वापरल्या जाणार्या यंत्रांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.
सोलर वॉटर हिटरही महागणार आहेत.
तयार लेदर आणि कंपोझिशन लेदरवर १२ टक्के जीएसटी लागू होईल.
१००० रुपयांपर्यंतच्या हॉटेल खोल्यांवर १२ टक्के कर आकारला जाईल. यापूर्वी यावर सवलत होती.
रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी इत्यादींच्या करारांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.