यावल : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने यावल तालुका हादरला आहे. तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर नात्यातीलच आरोपीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवार, 13 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी या पोलिसात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. शांतारा मधनसिंग गायकवाड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
हे पण वाचा..
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा
..तर मी राजकारण सोडेन ; शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान
घरी कुणी नसताना केला अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मतिमंद पीडीता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 13 जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेल्यानंतर घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपी शांतारा मधनसिंग गायकवाड याने पीडीतेला गावातील बकर्यांच्या वाड्यात नेत तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पीडीतेला घेवून यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.