मुंबई,(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात उभी फूट पडल्याने थेट महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. सत्ता बदल झाल्यावर देखील राज्यातल्या राजकीय उलथापालथ सुरूच आहे. आज शिवसेनेच्या तब्बल ५३ आमदारांना नोटीसा निघाल्या आहेत दरम्यान शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आले आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच ५३ आमदारांना एकत्र नोटीसा निघाल्याची घटना आहे, यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
‘व्हीप’ पाळला नसल्यानेच नोटीस…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना नोटिसा मिळाल्या आहेत, दरम्यान सोमवारी सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीच्या वेळी व्हिपचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला असल्याने शिवसेनेच्या या ५३ आमदारांना नोटीस निघाल्या असून पुढील आठवडाभरात नोटीसीला उत्तर मागविण्यात आले आहे.
कोणी दिली नोटीस…
राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
एकमेकांना काढला होता ‘व्हीप’…
महाविकास आघाडी कोसळल्या नंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी नवं सरकार स्थापन केलं, दोन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दिवशी म्हणजे ४ जुलै रोजी एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या आमदारांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही शिवसेनेच्या सर्व आमदारांना सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर एक आमदार शिंदे गटात सहभागी झाला. तसेच १५ जणांनी विरोधात मतदान केले होते.
हे पण वाचा :
उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांना दणका ! जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून केली हकालपट्टी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिंदे गटातील बंडखोर आमदाराला क्लिन चिट
…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका