चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात लग्नाची जबरदस्ती करत तरुणीच्या घरात जाऊन विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती म्हणजे एका 13 वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याची घटना समोर आलीय.
ही तरुणी सातव्या वर्गात शिकते. मात्र, एका घराजवळ राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातूनच ती गर्भवती (13 year girl pregnant) राहिली. याबाबत तिला कोणतीच कल्पना नव्हती. मात्र, सहाव्या महिन्यात तिचे पोट दुखत असल्याने आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) यांनी दिली. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे पण वाचा :
खडसे महाविकास आघाडीत अन्.. गिरीश महाजन यांची टीका
वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर
नोकरीची सुवर्णसंधी..! सरकारच्या खत कंपनीमध्ये बंपर भरती, लगेचच अर्ज करा
येत्या ५ वर्षात देशात पेट्रोलवर घालण्यात येणार? नितीन गडकरींचा खळबळजनक दावा
ही 13 वर्षांची मुलगी चिमूर तालुक्यातील आहे. तसेच तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवणारा मुलाचे घर आणि तिचे घर जवळच आहे. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यानंतर त्यांचे हे प्रेम थेट शारिरिक संबंधांपर्यंत पोहोचले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.