मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. यामुळे ठाकरे सरकार अस्तित्वात आले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापन केली आहे. दरम्यान शिवसेनेने सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्व उभा केले त्याचाच विसर जर यांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ते नाशिक येथे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधत टोला लगावला आहे.
मतदार संघात निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे वेगळेच आहेत. गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) तर जुलाबराव असे म्हणत त्यांना मिळालेले ५० खोके कधीच पचणार नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हे सर्व पेशासाठी केल्याचा आरोपही त्यांनी आमदारांवर केला आहे.
हे पण वाचा :
नोकरीची सुवर्णसंधी..! सरकारच्या खत कंपनीमध्ये बंपर भरती, लगेचच अर्ज करा
येत्या ५ वर्षात देशात पेट्रोलवर घालण्यात येणार? नितीन गडकरींचा खळबळजनक दावा
महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ
अभिनेत्री आमना शरीफचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ
दरम्यान बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. सर्वसामान्य जनता आजही पक्षाच्या पाठीशी आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. असे संजय राऊत म्हणाले आहेत.