मुंबई : एकनाथ शिंदेंनी केली बंडखोरी महाविकास आघाडीला महागात पडली. शिंदेंना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिल्याने अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं आहे. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे. महाविकास आघाडीला आता नव्या सरकारकडून एकामागोमाग एक धक्के दिले जात आहे. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केला आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील प्रत्यक्ष सुरू न झालेल्या कामांच्या सर्व स्तरावरील निविदा रद्द करण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जलसंधारणाची ५ हजार कोटी रुपयांची नवीन कामे रद्द झाली आहेत. शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आणखी एका महत्त्वपूर्ण कामाला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हे पण वाचा :
येत्या ५ वर्षात देशात पेट्रोलवर घालण्यात येणार? नितीन गडकरींचा खळबळजनक दावा
महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ
अभिनेत्री आमना शरीफचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ
मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत इतके मंत्रिपद
जलसंधारण विभागांतर्गत महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ काम करते. या महामंडळाकडील प्रगतीपथावरील प्रकल्पांचे प्रलंबित दायित्व हे ३,४९० कोटी रुपये होते. असं असतानाही १ एप्रिल ते ३१ मे २०२२ दरम्यान ६,१९१ कोटी रुपये खर्चाच्या ४,३२४ नवीन योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ५,०२० कोटी ७४ लाख रुपये खर्चाची ४ हजार ३७ कामे निविदेच्या विविध स्तरावर आहेत.
निविदा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेली ५,०२०.७४ कोटी रुपयांच्या खर्चाची ४ हजार ३७ कामे ही रद्द करण्याचा निर्णय नवीन सरकारने घेतला आहे. यातील कोणत्याही कामाच्या निविदा अंतिम करण्यात येऊ नयेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा कोणत्याही कामास सुरुवात करू नये, असं जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयात नमूद केलं आहे.