मुंबई : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक चिन्हं वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.
गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. त्यांना शिवसेनेच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. ते पाहाता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं आहे.
हे पण वाचा :
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्लेखोराने झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर
ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप ; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा
राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता
..म्हणून मी बंडखोरी केली.. आ. चिमणराव पाटलांची धक्कादायक ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं
दरम्यान, विधीमंडळात या घडामोडी सुरू असताना बंडखोर गटाने आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे सांगत निवडणूक चिन्हावरही दावा करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.