बंगलोर : कर्नाटकात थोडक्यात एक मोठा अपघात टळलाय. कर्नाटकातील बिदरच्या बेहलकी क्रॉसिंगवर ट्रेन आणि ट्रकची धडक झाली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेन कशी धडकली हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. ट्रकला धडकल्यानंतर ट्रेन थांबली.
रेल्वे रुळावर अडकलेल्या ट्रकच्या मागच्या भागाला पॅसेंजर ट्रेन कशी धडकली हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रकची ट्रॉली रेल्वे रुळावरून पुढे जाऊ शकली नाही आणि ट्रेनला धडकली. मात्र, त्यानंतर गाडी थांबवण्यात यश आले. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#WATCH कर्नाटक: बीदर के बहलकी क्रॉसिंग पर ट्रेन ट्रक से टकराई। हादसे में किसी के घायल होने की सूचना नहीं है। pic.twitter.com/K5WcfNxTGu
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2022