उस्मानाबाद,(प्रतिनिधी)- दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर शिकवणाऱ्या शिक्षकाने वारंवार बलात्कार करून विद्यार्थिनीला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेनं पीडित विद्यार्थिनीचे कुटुंब हदरून गेलं आहे.शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उस्मानाबादेत घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिक्षक अमित माळी विरोधात पोलिसांनी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली असून आरोपी विरुद्ध कलम 376,(2)(फ) भा.द.वि. सह 4, 8, 12 आण बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
गर्भवती असल्याचे असे झाले उघड….
दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. गेले अनेक दिवस हा नराधम शिक्षक मुलीचा लैगिंक छळ करून बलात्कार करीत होता असा आरोप पीडितेने केला आहे.ही विद्यार्थिनी एके दिवशी स्कुटीवरुन प्रवास करत होती. त्यावेळी तिला अचानक रक्तस्त्रावाचा त्रास सुरु झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे या मुलीची तपासणी केल्यानंतर ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यावर पीडित मुलीचे कुटुंब चांगलेच हादारले आहे.