मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे बदल केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात जागा फिक्स झाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. दरम्यान, लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रकांत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून 3 नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. तर दुसरीकडे, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजप संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षाची धुरा नव्या नेत्याच्या खांद्यावर देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य भाजपाचा अध्यक्षही मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. शेलार हे मुंबईतील आक्रमक भाजपा नेते आहेत. ते यापूर्वी मुंबई भाजपा अध्यक्ष तसंच फडणवीस सरकारमध्ये मंत्री देखील होते.
हे पण वाचा :
भारतीय नौदलमध्ये तब्बल 2800 पदांसाठी मेगा भरती ; 40000 पगार मिळेल
सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका ; LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
CCTV : भुसावळ रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेचा थोडक्यात बचावला जीव; पाहा व्हिडिओ
टप टप बरसा पानी… लेटरने आग लगाई … शिवसेना खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र
भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. नगर जिल्ह्यातील शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील नाव भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.’पक्षानं मला आजवर भरभरून दिलं आहे. यापुढेही पक्षाचा जो आदेश असेल तो स्विकारेन’ असं बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेवर बोलताना जाहीर केले आहे.