मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार अशी दाट शक्यता होती आणि तशी चर्चाही रंगली होती. पण, अचानक फडणवीस यांनीच पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पण, अमृता फडणवीस यांनीही हे सर्व फेटाळून लावलं आहे.
”मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
हे पण वाचा :
भारतीय नौदलमध्ये तब्बल 2800 पदांसाठी मेगा भरती ; 40000 पगार मिळेल
सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका ; LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
CCTV : भुसावळ रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेचा थोडक्यात बचावला जीव; पाहा व्हिडिओ
टप टप बरसा पानी… लेटरने आग लगाई … शिवसेना खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र
“वेश बदलून भेटी व्हायच्या”
एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात भाषण करताना रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो, असं सांगितलं. त्यांच्या या विधानाला अमृता फडणवीस यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. “देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.