मुंबई: मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांचे सरकार आज विधासभेत पहिल्या अग्निपरीक्षेला सामोरे गेले आहे. रविवारी आणि सोमवार अशा दोन दिवसांसासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षांची निवड पार पडली असून यात भाजपचे राहुल नार्वेकर (rahul narvekar) निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या राजन साळवी (rajan salvi) यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते पडली. तर राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले.
हे पण वाचा :
गृहिणींना आणखी दिलासा मिळणार; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार
मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता
मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो
या विजयानंतर भाजप (bjp) आमदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. तर विधानभवन परिसरात भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. शिवसेना आणि शिवसेना बंडखोरांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या संघर्षात बंडखोरांनी भाजपच्या साथीने पहिली लढाई जिंकली आहे. आता विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी सासरे बसलेले दिसणार आहेत.