मुंबई: शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी बंडखोर आमदारांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कारवाईचं सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे. अशातच आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा :
गृहिणींना आणखी दिलासा मिळणार; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार
मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता
मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो
एकनाथ शिंदे यांचावर मोठी कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेविरोधातील बंडखोरी भोवली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. “तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील ‘शिवसेना नेते’ पदावरून दूर करत आहे, असे पत्र काढून ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे.