मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यातील राजकीय भूकंपाचे धक्के संपूर्ण महाराष्ट्र राज्याने अनुभवले आहेच, राजकीय वातावरण तापले असतांना गेल्या 11 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. या बंडखोर आमदारांची आज मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भजपा नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप नेत्यांसह आमदार देखील उपस्थित असणार आहेत. हे सर्व आमदार हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे.
उद्या दिनांक ३ रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रचंड तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेल्या ११दिवसांपासून राज्याबाहेर असलेले बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. या बंडखोर आमदारांची आज मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचादेखील समावेश होता. विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांना घेऊन या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाले आहेत.