मुंबईः एकनाथ शिंदे यांनी बंद पुकारला होता. त्यांना शिवसेनेचे जवळपास ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले असून याच दरम्यान, अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. हा व्हीप नियमानुसार सर्वच आमदारांसाठी लागू होणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते सुनील प्रभू यांचा व्हीप मानतात की भाजपच्या उमेदवाराला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा :
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो
या कारणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर अनेकांनी व्यक्त केला संताप ; नेमका काय आहे प्रकार? पहा Video
ठरलं ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून यांना तिकीट
बंडखोर आमदारांची भूमिका काय?
बंडखोर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने नुकतेच पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्यानंतर शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या अजय चौधरींच्या नियुक्तीला शिंदे गटाने विरोध केला आहे. शिंदे गट अजूनही आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करतंय, मात्र अधिकृतरित्या अजूनही उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आता पक्षादेश मानणार तो कुणाचा असा प्रश्न निर्माण झालाय.