मुंबई : सत्तेतून पाय उतार होताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीपाठोपाठ सीबीआयने आता क्लिन चीट दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे ईडीने स्पष्ट केलं आहे.
श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. त्यामुळे ईडी ही मातोश्रीपर्यंत पोहोचली अशी चर्चा रंगली होती. पण, आता सत्तेतून पाय उतार होताच उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे.
CBI ने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर झाला असून यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या बाबतीत कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यांचा थेट सहभाग गैर व्यवहारात आढळले नाहीत, असं नमूद करण्यात आले आहे.