नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणासाठी एक संधी चालून आलीय. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये भरती निघाली असून यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. लक्ष्यात असू द्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2022 आहे. तुम्ही तुमचे अर्ज नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवू शकता.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 89 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुक उमेदवारांना अर्ज केवळ पोस्टाद्वारे करता येणार आहे.
रिक्त पदांचा तपशील:
एकूण 89 टेक्निशियन पदांवर भरती काढण्यात आली आहे. ज्यामध्ये ओबीसींसाठी 21, ईडब्ल्यूएससाठी 8, एससीसाठी 12 आणि एसटीसाठी 6 पदं आरक्षित करण्यात आली आहेत. इतर 32 पदं अनारक्षित आहेत.
इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक योग्यता
अर्जदार दहावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित व्यापारातील आयटीआय पदवी देखील असणं आवश्यक आहे.
कशी होणार निवड?
CBT परीक्षेद्वारे अर्जदारांची निवड करण्यात येणार आहे. परीक्षेचा कालावधी 2 तास 30 मिनिटांचा असून एकूण 150 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा नमुना अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
कसा कराल अर्ज?
इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nplindia.org वर भेट द्यावी.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या Careers सेक्शनवर क्लिक करावं.