मुंबई : Reliance Jio कडून ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन दिले जात आहे. अशातच रिलायन्स जिओचे ३ प्रीपेड प्लान्स आहेत. ज्यात दररोज १ GB डेटा मिळतो जिओचे हे प्लान्स सुमारे २०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची किंमत १४९ रुपये, १७९ रुपये आणि २०९ रुपये आहे. १४९ रुपयांचा प्लान २० दिवसांच्या वैधतेसह येतो तर २०९ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता देतो. रिलायन्स जिओच्या २०९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये दररोज १ GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण २८ GB हाय-स्पीड डेटा देण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. Jio च्या या प्रीपेड पॅकमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल आणि १०० SMS उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
१७९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक
रिलायन्स जिओच्या १७९ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता २४ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये १ GB प्रतिदिन एकूण २४ GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
हे पण वाचा :
चाळीसगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईचा आढळला विहिरीत मृतदेह
ब्रेकिंग : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट ; म्हणाले..
अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम
१४९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक
१४९ रुपयांच्या Jio रिचार्ज पॅकची वैधता २० दिवसांची आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण २० जीबी हाय-स्पीड डेटा ग्राहकांना दिला जातो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत घसरतो. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय, Jio च्या या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioCinema, Jio Cloud चे सदस्यत्व मोफत उपलब्ध आहे.