चाळीसगाव | चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. दोन चिमुकल्यांसह आईचा विहिरीत बुडून मृत्यू आल्याची घटना तालुक्यातील रांजणगाव शिवारात उघडकीस आलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना
शिरपूर येथील मनोज पावरा हे रांजनगाव (ता. चाळीसगाव) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांचा २०१५-१६ मध्ये मध्यप्रदेशातील खेडी गावामधील ईला हिच्याशी विवाह झाला. त्यानंतर रितेश पावरा (वय ५) व महेश पावरा (वय ११ महिने) अशी दोन मुले आहेत. घरात हलाखीची परिस्थिती असल्याने पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
मात्र २९ जूनला रात्री साडेदहा वाजेपूर्वी रितेश व महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय २५) यांचा मृतदेह (Death) एका विहिरीत आढळून आला. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस (Police) घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढत पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले.
हे पण वाचा :
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट ; म्हणाले..
अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी..
त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा दोघांचेही मृतदेह मिळून आले. दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.